सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम; सांगितले 'हे' कारण

Maharashtra Assembly Polls | '...म्हणाले माझ्याकडे पर्याय नाही'
Maharashtra Assembly Polls
शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी अखेर माघार घेतली.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Polls | राज ठाकरेंनी माझी भेट नाकारली, त्यांचं मी ऐकलं असतं. राज ठाकरे भेटत नाहीत, मी तर काय करणार. आता विषय संपला मी निवडणूक लढवणारच, असे माहीम विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज, सोमवारी दुपारी संपते आहे. माहिम विधानसभेत अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेने येथून उमेदवार मागे घ्यावा, असे सूर उमटू लागले होते. विशेषतः, भाजप नेत्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मनसेनेही जोर लावला आहे. भाजपची त्यांना साथ मिळत आहे. त्यामुळे सदा सरवणकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी दबाव निर्माण केला जात होता. ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंचे उमेदवार असलेले विद्यमान आमदार सदा सरवणकरांनी माघार घेतली नसल्याने माहिममध्ये आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट आहे.

राज ठाकरेंनी माझी भेट नाकारली. त्यांनी बोलण्यास नकार दिला. राज ठाकरे म्हणाले मला भेटायचं नाही. त्यामुळे मला माहिममधून लढावच लागेल. त्यांचं मी ऐकलं असतं. ते जे आदेश देतील ते पाळण्याचं ठरवल होतं. पण त्यांनी भेटच नाकारली. त्यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं असेल तर उभे रहा, मला भेटायचं नाही. राज ठाकरे भेटत नाहीत, मी तर काय करणार, आता विषय संपला मी निवडणूक लढवणार, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news