नगर : पुढारी वृत्तसेवा
सीना नदी पूर रेषा फेर सर्वेक्षण करण्याला शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी मान्यता दिली.
सीना नदी पूर रेषेचे फेर सर्वेक्षण करावे, अशी मागणी प्रहार वारकरी संघटनेचे अध्यक्ष अजय महाराज बारस्कर यांच्यासह नागरिकांनी केली होती. तसेच आमदार संग्राम जगताप यांनीही जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला होता.
त्यासंदर्भात शुक्रवारी मुंबई मंत्रालयातील जलसंपदा विभागामध्ये जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य अभियंता, उपअभियंत्यांसह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सीना पूर रेषेचे फेर सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. तर, सीना नदीतील गाळ काढण्याच्या कामाला मान्यता देऊन त्यास निधी प्रस्तावित केला. नदी पात्रातील अतिक्रमणे हटविण्याबाबत सूचना दिल्या. गाळा काढल्यानंतर आपोआप पूरषाखाली येईल, असेही ते म्हणाले.
नगरकरांना दिलासा
सध्या सीना नदीच्या पूररेषेमध्ये अनेक नागरिकांची पक्की बांधकामे आहेत. तर नव्याने बांधकाम करण्यास कोणालाही परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे अनेकांची अडचण झाली होती. फेरसर्वेक्षणामुळे त्यांना दिलासा मिळण्याचे संकेत आहेत.