विधवेवर अत्याचारः चौघांविरुद्ध गुन्हा

molestation
molestation
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा:  मृत मित्राच्या मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकी देत मित्राच्या विधवा पत्नीवर संगमनेर येथे चौघांनी अत्याचार केला. दरम्यान, मुलीवर सुद्धा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना महिला आयोगाकडे पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आली. दरम्यान, महिला आयोगाच्या आदेशा नंतर संगमनेर शहर पोलिसांनी चौघांविरुद्ध अत्याचारासह अत्याचाराचा प्रयत्न या कलमांव्ये गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, संगमेनर येथे राहणारे अधिकारी लग्नानंतर नोकरीनिमित्त जालन्याला राहत होते. 1 एप्रिल 2021 रोजी पीडितेच्या पतीचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मित्र शाम कुमार देवानंद पुरभे (रा. म्हसरूळ, ता. जि. बुलढाणा) सांत्वन करण्यास आला. यानंतर त्याचे येणे -जाणे सुरू झाले. त्याने पिडितेच्या पतीची रक्कम उसणी घेतली, मात्र कालांतराने त्याची नियत फिरली. त्याने पैसे देण्यास नकार दिला.

पीडितेने मुलींच्या शिक्षणासह घर खर्चासाठी पैशांची वारंवार मागणी केली, मात्र त्याने कायम तिला उडवा उडविची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळा टाळ केली. त्यामुळे पिडितेने ( 19 डिसेंबर 2021) रोजी मेजर पुरभे याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. यानंतर तो पसार झाला होता. दरम्यान, गुन्हा मागे घेण्यासाठी पुरभे पिडितेला व्हाटसअ‍ॅपवरुन धमक्या देत होता. पिडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत दारूच्या नशेमध्ये तिच्यावर अत्याचार केला. काही मित्र आणून पिडितेचे घर जाळले. याबाबत पिडितेने कादीम पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र, न्याय मिळाला नाही. तिने दोन मुली घेऊन संगमनेर गाठले.

दरम्यान, शामकुमार पुरभे, जय राम पाठे, अक्षय मांडवे व पंकज धमणे हे दारु पिऊन संगमनेरला आले. पुरभे याने पिडितेच्या मुलीचा हात धरला. पिडितेशी झटापट सुरू करुन, पीडितेवर अत्याचार केला. धमकी देऊन सर्वजन निघुन गेले. पिडितेने महिला आयोगाकडे तक्रार केल्याने पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news