

नेवासा : पुढारी वृत्तसेवा
औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात गॅसवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे महामार्ग एका बाजूने बंद करण्यात आला आहे. त्यामुळे चालती बस स्विप्ट कारला आदळून बस रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून जाऊन उलटली. या अपघातातात स्विप्ट कारमधील एकजण ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.
महाड (जळगाव) आगाराची एस.टी. बसजळगावकडे जात असताना पुणे येथील पाचजण स्विप्ट कारमधून शनिशिंगणापूर येथील देवदर्शन करुन देवगड येथून पुण्याकडे जात होते. कांगोणी फाटा शिवारात महामार्गाच्या बाजूने गॅसवाहिनीचे काम सुरू असल्यामुळे एका बाजूने महामार्ग बंद केला. त्यामुळे महाड आगाराची बस स्विप्ट कारवर धडकली.
यावेळी स्विप्ट कारमध्ये पाच जण होते. त्यातील विशाल ओर्हा (वय 36, रा.गंगाधाम पुणे हे या अपघातात जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली. अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने चालती बस स्विप्ट कारला धडकून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून अडकली.
त्यामुळे बसमधील प्रवासी सुखरुप असल्याचे प्रवाशांनी ही माहिती दिली. याबाबत शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता दोन जखमींना नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील मृत विशालाचे पार्थिव येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवले आहे.