वाळकी : पुढारी वृत्तसेवा
महावितरण कंपनीच्या लघुदाब वाहिनीवरील तब्बल 1.2 किलोमीटर लांबीच्या वीजवाहक तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. ही घटना नगर तालुक्यातील खारेकर्जुनेच्या शिवारात घडली. या वीजवाहक तारा चोरीला गेल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत महावितरणचे कर्मचारी दुर्गेश साखारवाडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खारेकर्जुनेच्या शिवारातील वेताळमळा परिसरात असलेल्या लघुदाब वाहिनीच्या 10 गाळ्यांमधील सुमारे 1.2 किलोमीटर लांबीच्या वीजवाहक तारा चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महावितरणच्या स्थानिक कार्यालयाने नगर तालुका कार्यालयाशी संपर्क साधून वीजवाहक तारा चोरीला गेल्याची माहिती दिली. सोमवारी 30 मे ला कार्यालयीन प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंंगळवारी महावितरणचे कर्मचारी दुर्गेश साखारवाडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.