दोन कोल्ह्यांना मिळाले जीवदान; जेऊरची घटना

दोन कोल्ह्यांना मिळाले जीवदान; जेऊरची घटना
Published on
Updated on

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथील पोलिस व वनमित्र पथकाच्या सतर्कतेमुळे दोन कोल्ह्यांना जीवदान मिळाले. ही घटना बुधवारी (दि.16) घडली. शेततळ्यात पडलेल्या कोल्ह्यांना वनमित्र पथकातील सदस्यांनी सुखरूप बाहेर काढले. तोडमलवाडी शिवारातील गट नंबर 1646मध्ये अजय लक्ष्मण तोडमल यांचे शेततळे आहे.

शेततळ्यामध्ये अजय तोडमल यांना दोन कोल्हे पडल्याचे समजताच त्यांनी पोलिस व वनमित्र पथकाशी संपर्क साधला. पथकातील सदस्य मायकल पाटोळे, सनी गायकवाड, शशिकांत पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेततळ्यात पाणीही भरपूर होते, कोल्हे वर येण्याचा प्रयत्न करत होते. शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरत असल्याने त्यांना वर येणे शक्य होत नव्हते.

या घटनेची माहिती वनरक्षक मनेष जाधव यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली, या ठिकाणी विविध वन्य प्राण्यांचे पद मार्ग असल्याचे आढळून आले. उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरीक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्ह्याचे रेस्क्यू ऑपरेशन करण्याचे ठरले.

पोत्याला पोते बांधून शेततळ्यात सोडण्यात आले. पोत्यांच्या आधाराने दोन्ही कोल्ह्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याने दोन कोल्ह्यांचे प्राण वाचले. या परिसरात विविध वन्य प्राण्यांचा संचार जास्त प्रमाणात आढळतो. रान मांजर, कोल्हे, हरीण, खोकड या प्राण्यांचे पद मार्ग येथे आढळून आले आहेत. कोल्ह्यांना वाचविण्यासाठी प्राणीमित्र विद्यासागर पेटकर, वन कर्मचारी संजय सरोदे, अण्णा मगर, बबलू म्हस्के, अजय तोडमल यांच्यासह स्थानिकांनी मदत केली.

नगर तालुक्यात उसाचे क्षेत्र घटल्यामुळे कोल्ह्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येते. पूर्वी सर्वत्र कुई-कुई ऐकू यायची; पण आता तो आवाज दुर्मिळ होत चालला आहे. इमामपूर, बहिरवाडी पट्ट्यात कोल्ह्यांची संख्या जास्त प्रमाणात आढळते.

– मनेष जाधव, वनरक्षक, वनविभाग

जेऊर येथील पोलिस व वनमित्र पथकाचे कार्य कौतुकास्पद आहे. ग्रीन अ‍ॅण्ड
क्लीन गर्भगिरी हा पथकाने सुरू केलेला उपक्रम आदर्शवत आहे. त्यासाठी त्यांना सर्व तरुणांनी सहकार्य करावे.

– ज्योती तोडमल, सरपंच, जेऊर

.हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news