शिवशाही बसला नारायणगाव येथे अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला | पुढारी

शिवशाही बसला नारायणगाव येथे अपघात; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

नारायणगाव :पुढारी वृत्तसेवा :  पुणे- नाशिक महामार्गावर नाशिकच्या दिशेला निघालेल्या शिवशाही बसला नारायणगाव या ठिकाणी बाह्य वळणावर खोडद चौकात दुचाकी स्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात लेन तोडून विरुद्ध दिशेला जाऊन अपघात झाला आहे.
या अपघातात दुचाकी स्वार सिद्धेश उर्फ साई सोपान पाटे यास किरकोळ दुखापत झाली आहे, तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात शुक्रवारी सकाळी घडला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

पुण्याहून नाशिकच्या दिशेला निघालेली शिवशाही बस ही सकाळी नारायणगाव येथील बाह्यवळणावरील खोड चौकात आली असता नारायणगाव येथून खोडद दिशेला दुचाकी घेऊन निघालेला साई उर्फ सिद्धेश हा देखील चौकात आला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाहीच्या चालकाने बस विरुद्ध दिशेला नेली. त्यामुळे शिवशाही बसला अपघात होऊन बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर सिद्धेश उर्फ साईच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हा अपघात झाल्यानंतर शिवशाही बसचा हायड्रोलिक दरवाजा लॉक झाल्याने मदतीला आलेल्या नागरिकांनी बसची पुढील काच फोडून प्रवाशांना पिकअप गाडीच्या साह्याने बाहेर काढले. घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, हवालदार संतोष कोकणे, गंगाधर कोतकर व कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

चीनमध्ये मंदीचे वारे; सर्वांत बलाढ्य बांधकाम कंपनी दिवाळखोरीत | Evergrande files for bankruptcy

स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक नाशकात, प्रभागनिहाय पाहणी

Back to top button