नगर पोलिस दलातील 49 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !

नगर पोलिस दलातील 49 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या !
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर पोलिस दलातील जिल्ह्याअंतर्गत बदल्यांच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू असतानाच शनिवारी (दि.5) पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी 49 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले. दहा पोलिस निरीक्षक, 17 सहायक पोलिस निरीक्षक व 22 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या एसपी ओला यांनी केल्या असून, यामध्ये 19 पोलिस अधिकार्‍यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षात बर्‍याच दिवसांपासून असलेल्या पोलिस निरीक्षक विजय करे यांच्यावर पोलिस अधीक्षक यांनी अकोले पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवली आहे. तर, जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्यांच्या यादीत असलेले पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांना सायबर पोलिस ठाण्याचे प्रमुख करण्यात आले.

तसेच, नव्याने हजर झालेल्या सहा पोलिस निरीक्षकांपैकी प्रदीप देशमुख यांना कोपरगाव शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली. पोलिस निरीक्षक हरिश खेडकर यांना एएचटीयुचे प्रभारी करण्यात आले. पोलिस निरीक्षक अशोक भवड यांना मानव संसाधन येथे नियुक्ती देण्यात आली. पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांची ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले व रामराव ढिकले यांची नाशिक ग्रामीणमध्ये स्वतंत्र आदेशाने बदली करण्यात आली आहे. दरम्यान, बदल्यांसाठी चर्चेत असलेल्या काही पोलिस अधिकार्‍यांची नावे मात्र या बदली यादीत समाविष्ठ न झाल्याने त्यांना एसपी राकेश ओला यांनी पुन्हा वेटिंगवर ठेवल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news