फायनान्स कंपन्यांकडून नितीन देसाईंचा छळवाद

फायनान्स कंपन्यांकडून नितीन देसाईंचा छळवाद
फायनान्स कंपन्यांकडून नितीन देसाईंचा छळवाद

अलिबाग, पुढारी वृत्तसेवा : नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यातील तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण होताच प्रत्यक्ष कारवाई करण्यात येईल. अद्याप या प्रकरणी कुणालाही ताब्यात घेण्यात आले नसल्याची माहिती रायगड जिल्हा पोलिसांनी दिली आहे.

ईसीएल फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी फायनान्स कंपनीचे केयुर मेहता, रशेष शहा, स्मित शहा, एडलवाईज ग्रुप कंपनीचे आर. के. बन्सल, प्रशासक जितेंद्र कोठारी यांनी एन. डी. स्टुडिओच्या कर्जाच्या वसुलीकरिता नितीन देसाई यांना प्रचंड मानसिक त्रास देऊन त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नेहा देसाई यांनी तक्रार दिली आहे.

देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी इसीएल कंपनीच्या एडलवाईज ग्रुपच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा झाला आहे. कर्जाच्या परतफेडीसाठी सातत्याने तगादा लावत मानसिक त्रास दिला. मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नेहा देसाई यांनी तक्रारीत म्हटले आहे.

ईसीएल फायनान्स कंपनीकडून माहिती मागवली; 15 साक्षीदारांचे जबाब पूर्ण दरम्यान, दाखल गुन्ह्याच्या तपासाच्या पहिल्या टप्प्यात ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देऊन विविध मुद्द्यांवर माहिती मागविली आहे. ही माहिती प्रत्यक्ष हजर राहून सादर करण्याबाबत नोटीस दिली आहे. त्याच बरोबर एन. डी. स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार व अकौंटंट यांच्याकडून या कर्ज प्रकरणाबाबत तपासी अधिकारी हे अधिक माहिती घेत आहेत. आतापर्यंत 15 साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत.

नितीन देसाई यांच्या व्हाईस क्लिपच्या आधारे फायनान्स कंपनीचा छळवादही सांगितला…

या व्हाईस क्लिपमध्ये रशेष शहा हा गोडबोल्या असून त्याने छोट्या-मोठ्या उद्योजकांसाठी कष्टाने बनविलेला माझा स्टुडिओ गिळण्याचे काम केले. 100 फोन केले. परंतु फोन उचलत नाही.

138, ईओडब्ल्यू, एनसीएलटी, एनसीएलटी, डीआरटी यांच्याकडून प्रचंड छळवाद केला. माझ्याकडे दोन-तीन इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला सहकार्य केले नाही.

माझ्यावर डबल टिबल किमतीचा बोजा टाकून दबाव टाकला. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगळ्या पद्धतीने दबाव टाकला. स्मित शहा, केयर मेहता, आर. के. बन्सल माझा स्टुडिओ लुटण्याचा, माझी नाचक्की करून मला घेरण्याचे काम करीत आहेत. या लोकांनी माझी वाट लावली आहे.

मला पैशांच्या बाबतीत धमक्या दिल्या. नराधमांनी मला प्रेशराईज केले. सोन्यासारखे असलेले ऑफिस विकायला लावले, एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचे काम या नराधमांकडून होत आहे. मला षड्यंत्र करून, दडपून टाकून संपविले. माझ्या मनात नसतानाही त्यांनी करायला भाग लावलेले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news