नगर : दरोडेखोरांच्या रिक्षाचा सिनेस्टाईल पाठलाग

नगर : दरोडेखोरांच्या रिक्षाचा सिनेस्टाईल पाठलाग
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  कायनेटिक चौकात बारामती येथे जाण्यासाठी थांबलेल्या चार कामगारांना जबर मारहाण करीत लुटणार्‍या टोळीला कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासांत बेड्या ठोकल्या. कामगारांना मारहाण करून दरोडेखोर रिक्षातून पळाले; पण पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी काही वेळातच आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली. दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. स्वप्नील बाबूराव साळवे (वय 29), नीरज रवी पटारे (वय 19), रितेश सुरेश शेंडगे (सर्व रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

प्रीतम ऊर्फ पेप्या सावंत (रा.मोहिनीनगर केडगाव, अहमदनगर) हा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. मंगळवारी (दि.29) मध्यरात्रीनंतर पवन सुरेश पैठणे, किरण रामेश्वर गोफणे, अजय लक्ष्मण गोफणे, गोविंद दादाराव गोफणे हे चौघे बारामती येथे जाण्यासाठी कायनेटिक चौकात वाहनाची वाट पाहत थांबलेले होते. पहाटे अडीच वाजता रिक्षातून आलेल्या सहा जणांनी त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पोबारा केला.

पवन पैठणे (रा. तपोवन गोंधन, ता.जाफराबाद, जि. जालना) यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केडगावच्या दिशेने दरोडेखोर रिक्षातून गेल्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक यादव यांनी तत्काळ पथके रवाना केली. मोबाईल व रोख असा 93 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चार किलोमीटर पाठलाग
दरोडेखोर कायनेटिक चौकातून केडगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक यादव पथकासह रवाना झाले. दरोडेखोरांची रिक्षा दिसताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. केडगावनंतर सोनेवाडी असा चार किलोमीटरचा सिनेस्टाईल पाठलाग करून या पथकाने दरोडेखोरांना अटक केली. सहायक निरीक्षक रवींद्र पिंगळे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, अंमलदार अशोक सरोदे, याकुब सय्यद, तानाजी पवार, सोमनाथ मुरकुटे, प्रशांत बोरुडे, मधुकर चव्हाण, सत्यम शिंदे, योगेश ठोंबे, होमगार्ड पाटसकर, मुर्तुजा सव्यद, शिंदे यांचा या पथकात समावेश होता.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news