‘रत्नदीप’चा मुद्दा पेटला ! रत्नदीप संस्थेच्या विरोधात जामखेडमध्ये कडकडीत बंद

‘रत्नदीप’चा मुद्दा पेटला ! रत्नदीप संस्थेच्या विरोधात जामखेडमध्ये कडकडीत बंद
Published on
Updated on

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचार, अर्थिक, मानसिक छळवणूक केली त्याच्या निषेधार्थ व डॉ. भास्कर मोरे या अद्याप अटक करण्यात आली नाही. यामुळे बुधवार दि. 13 रोजी जामखेड शहर कडकडीत बंद होते मेनरोड ; खर्डा रोड ; बीड रोड ; तपनेश्वर रोड येथील सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. जामखेड बंदची हाक उपोषणकर्ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले, रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केले होते. त्यानुसार जामखेड शहर हे ग्रामस्थाकडून १००% बंद पाळण्यात आले. रत्नदीप विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा बुधवारी नववा दिवस तर उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांच्या उपोषणाचा सतवा दिवस होता.

जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे याच्या विरोधात आठ दिवसापासून अंदोलन चालु आहे. आज अंदोलनाचा नववा दिवस आहे. विद्यार्थ्यांच्या अंदोलनानंतर डाॅ भास्कर मोरे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर हरीण पाळल्यामुळे वनविभागानेही गुन्हा दाखल केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लोणारे विद्यापीठ, आरोग्य विद्यापीठ नाशिक या विद्यापीठ समिती यांनी प्रत्यक्ष येऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही तसेच परिक्षा फॉर्म भरून घेतले जातील यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक मार्फत अहवाल मागीतला आहे.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नाही यामध्ये दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करणे, नोडल अधिकारी नियुक्त करणे, रत्नदीपची मान्यता रद्द करणे तसेच डॉ. मोरे वर गुन्हा दाखल होऊन सहा दिवस झाले पण पोलिसांकडून अद्याप अटक झाली नाही. त्यामुळे आंदोलन चालूच राहीले आहे. आंदोलक विद्यार्थी व शिवप्रतिष्ठाण हिदुस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने रत्नदीप संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा देऊन पालक म्हणुन जामखेड शहर कडकडीत बंद पाळण्यात आले आहे . व त्याला १००% प्रतिसाद मिळाला . बंदमुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कडक कारवाई करण्याचे आश्वासन

विद्यार्थ्यांच्या कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही यासाठी तिन्ही विद्यापीठ यांच्याशी संपर्कात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून कडक कारवाई करणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याना दूरध्वनीद्वारे संवाद साधण्यात आला वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी कारवाई करण्याबाबत दखल घेतली आहे. त्यामुळे सरकार हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत आ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news