

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उंबरे येथे दोन गटांत दगडफेकीत काही दुकानांचे व धार्मिक स्थळाचे नुकसान झाले. त्यात तीन जण जखमी झाले असून, पोलिसांनी दोन वेगवेगळ्या फिर्यादींनुसार 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करून दहा जणांना अटक केली आहे. दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंतर्गत कारणातून गावातील दोन गटांत धुसफूस सुरू होती. गावातील प्रमुखांनी दोन्ही गटांची बैठक घेऊन वादावर पडदा टाकला होता. पण बुधवारी रात्री मोठ्या जमावाने घोषणा देत दुकाने बंद करायला लावली. त्यात काही दुकानांचे नुकसान झाले. मारहाणीत तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर नगर व पुणे येथील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा उंबरे गावात पोेहोचला आणि आरोपींची धरपकड सुरू केली. सलीम वजीर पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दंगल, धार्मिक स्थळाचे नुकसान, हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल करत दहा जणांना अटक केली. त्या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दुसर्या गटानेही फिर्याद दिली आहे. त्यानुसार आलिशा निसार शेख व आवेज निसार शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
राजेंद्र रायभान मोहिते (वय 25 वर्षे, रा. गणेशवाडी, सोनई), गणेश अशोक सोनवणे (वय 21 वर्षे, रा. श्रीरामवाडी, सोनई), शेखर बाळासाहेब दरंदले (वय 30 वर्षे, रा. सोनई ), सचिन विजय बुर्हाडे (वय 25 वर्षे, रा. शिवाजीचौक, नवनाथ भागीनाथ दंडवते (वय 36 वर्षे, रा. ब्राह्मणी), संदीप भाऊसाहेब लांडे (वय 32 वर्षे, रा. लांडेवाडी सोनई), शुभम संजय देवरे (वय 25 वर्षे रा. स्टेशन रोड, राहुरी), सुनील उत्तम दाभाडे (वय 26 वर्षे, रा. क्रांती चौक, राहुरी), मारुती बाळासाहेब पवार (वय 22, रा. निंभारी, नेवासा), प्रतीक प्रकाश धनवटे (वय 29 वर्षे, रा. तनपुरे गल्ली, राहुरी).
कायदा हातात घेणार्यांवर कारवाई होणारच आहे. पोलिस प्रशासन चोख कारवाई करीत आहे. आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. अफवा पसरविणार्यावर कडक कारवाई केली जाईल.
– धनंजय जाधव,
पोलिस निरीक्षक
हेही वाचा