सातवा आयोग लागू व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करू : आ.जगताप

सातवा आयोग लागू व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करू : आ.जगताप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : मनपा कर्मचारी नगर शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लावतात. त्यांचे नगर शहराशी एक अतूट नाते आहे. त्यांचे अधिकार व हक्क त्यांना मिळालेच पाहिजे. यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असून, सातवा वेतन आयोग लागू व्हावा, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन आमदार संग्राम जगताप यांनी महापालिका कर्मचारी युनियनच्या पदाधिकार्‍यांना दिले.
अहमदनगर मनपा कामगार युनियनच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर, बाबासाहेब मुद्गल, सतीश ताठे, परिमल निकम, विकास गीते, बलराज गायकवाड, गुलाब गाडे, महादेव कोतकर, बाबासाहेब राशिनकर, विठ्ठल उमाप, राहुल साबळे, अमोल लहारे, अजित तारू उपस्थित होते. निवेदनात म्हटले, या महागाईच्या काळामध्ये कर्मचार्‍यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. याचबरोबर सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरी हक्क मिळावा अशा दोन मागण्या मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करावेत. .

लाखोंची वसुली

महापालिकेतील मानधनावरील इंजिनिअर व कर्मचारी यांना कायम सेवेत करण्यासाठी मानधनावरील एक कर्मचारी पाच ते दहा लाख रुपये गोळा करीत आहे, असा आरोप युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी यावेळी केला. तशी तक्रार ते आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे करणार असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती अनंत लोखंडे यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news