‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची बैठक 13 सप्टेंबरला

‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची बैठक 13 सप्टेंबरला
Published on
Updated on

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीच्या वतीने 13 सप्टेंबर रोजी समन्वय समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. 'इंडिया' आघाडीची तिसरी बैठक मुंबई या ठिकाणी नुकतीच पार पडली.

या बैठकीत भाजपविरोधातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडविण्यात येणार असल्याचेही मुंबईतील बैठकीत स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, 'इंडिया' आघाडीच्या वतीने समन्वय समितीची स्थापना करण्यात आली असून, राज्यनिहाय जागांचा आढावा घेण्याचे काम ही समिती करणार आहे. प्रचार समितीचीही स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये 21 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष अधिवेशनाच्या तोंडावर समन्वय समितीची बैठक होत असल्याने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news