वाळू तस्करांची तलाठ्यास मारहाण; नेवाशानंतर श्रीरामपुरातील घटना

वाळू तस्करांची तलाठ्यास मारहाण; नेवाशानंतर श्रीरामपुरातील घटना

Published on

श्रीरामपूर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवाशात तहसीलदार मारहाणीला 24 तासही उलटले नाही तोच श्रीरामपूर तालुक्यातील पढेगावचया तलाठ्यास वाळू तस्कारांनी बेदम मारहाण केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे. शिवाजी दरेकर असे मारहाण झालेल्या तलाठ्याचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत. महसूलच्या पथकाने पकडलेला अवैध वाळुचा साठा भेर्डापूर येथे चार दिवसांपासून स्मशानभुमीनजीक ठेवलेला होता.

या साठ्यातून काही लोक वाळू चोरून नेत असल्याची माहिती महसूलच्या अधिकार्‍यांना मिळाली. मंडल अधिकारी बाळासाहेब वायखिंडे, तलाठी बाळासाहेब कदम तसेच शिवाजी दरेकर यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यावेळी डंपरमध्ये (एमएच 12, एयु7621) जप्त साठ्यातून वाळू भरण्याचे काम सुरू होते. महसूलच्या पथकाला पाहताच वाळू भरणार्‍यांनी पळ काढला. परिस्थितीचे गांभीर्य पाहत महसूलच्या अधिकार्‍यांनी पोलिस बंदोबस्त मागविला.

दरम्यान, 20 ते 25 जणांचे टोळके तेथे आले. या टोळक्याने महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. या मारहाणीत तलाठी शिवाजी दरेकर यांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. दरेकर यांना वाचविण्यासाठी मंडलाधिकारी वायखिंडे तसेच इतर कर्मचारी धावले असता टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. या सर्व घटनेत काहींनी वाळू भरत असलेला डंपर पळवून नेला. घटनास्थळी पोलिस पोहचल्यानंतर जखमी झालेले तलाठी दरेकर यांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे.

कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

महसूल कर्मचार्‍यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे श्रीरामपूर तहसील व प्रांत अधिकारी कार्यालयात काम बंद आंदोलन करण्यात आले. महसूल विभागाच्या सर्वच कर्मचार्‍यांनी या घटनेचा निषेध केला. गुन्हा दाखल झाला असला तरी हल्लेखोर कोण? हे अद्याप समजलेले नाही. कारवाई करण्यासाठी केलेल्या महसूल पथकाचा जीव धोक्यात असतो. त्यांना वेळेत संरक्षण मिळत नाही, त्यामुळे काम करायचे कसे असा प्रश्न महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news