वाळकी : पुढारी वृत्तसेवा : जिद्द आणि अथक परिश्रमांच्या बळावर नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील शेतकर्याचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाला. ऋषिकेश दत्तात्रय कडूस याने हे यश मिळविले. एमपीएससी परीक्षेत ओबीसीमध्ये तो राज्यात प्रथम आला.
जानेवारी 2020 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.4) तब्बल साडेतीन वर्षांनंतर जाहीर झाला. त्यात ऋषिकेश कडूस याने 540 पैकी 400 गुण मिळविले. ऋषिकेशचे वडील दत्तात्रय शेतकरी आहेत.
स्पर्धा परीक्षेची नगर व पुणे येथे अभ्यासिकेत, तर शेवटी काही दिवस घरी राहून ऋषिकेशने तयारी केली.त्याने अभ्यासाबरोबरच व्यायामही केला. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाले. सारोळा कासार गावातील एमपीएससी परीक्षेद्वारे थेट पोलिस उपनिरीक्षक होणारा ऋषिकेश कडूस हा गावातील तिसरा तरूण ठरला.
हे ही वाचा :