नगर : कोयत्याच्या धाकाने कारचालकाला लुटले | पुढारी

नगर : कोयत्याच्या धाकाने कारचालकाला लुटले

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : एका पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला कार उभी करुन तिच्यात झोपलेल्या कार चालकासह महिलेला तीन व्यक्तिंनी कोयत्याचा धाक दाखवत लुटल्याची घटना नगर-पुणे महामार्गावर चास (ता.नगर) शिवारात मंगळवारी (दि.4) पहाटे घडली. चोरट्यांनी 21 हजारांची रोकड व सोन्याचे दागिने असा 1 लाख 72 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटून नेला.
याबाबत महादेव एकनाथ वाघमारे (रा.देहू, ता.हवेली, जि.पुणे) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वाघमारे हे वाहन चालक असून, त्यांच्याकडील कारने ते व त्यांची मेव्हुणी हे नगरहून पुण्याकडे जात होते.

रात्रीच्या वेळी त्यांना झोप येऊ लागल्याने चास शिवारातील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला त्यांनी कार उभी केली. ते कारमध्ये झोपलेले असताना तेथे एका मोटारसायकलवर एक तीन व्यक्ती आले. त्यांनी कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी वाघमारे यांच्याजवळील 21 हजारांची रोकड तसेच त्यांच्या मेव्हणीच्या अंगावर असलेले सोन्याचे दागीने बळजबरीने हिसकावून ते पळून गेले. याबाबत वाघमारे यांच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा : 

नाशिक : रानभाजी खाल्ल्याने नऊ जणांना विषबाधा

नगर : रुग्णवाहिकेस कार धडकून एक ठार

 

Back to top button