राहुरीतून 4 लाखांच्या डाळिंबाची चोरी

राहुरीतून 4 लाखांच्या डाळिंबाची चोरी

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍याच्या डाळींबाच्या बागेतून 4 लाख रूपये  किंमतीचे डाळिंब अज्ञात भामट्यांनी चोरून नेल्याची घटना राहुरी तालूक्यातील केसापूर येथे घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबासाहेब तुकाराम पवार (वय 53, रा. केसापूर, ता. राहुरी) यांची राहुरी तालूक्यातील केसापूर शिवारात अडीच एकर शेती आहे. सदर शेतीमध्ये डाळिंबांची सुमारे 750 झाडे लावलेली असून झाडाला लहान मोठी तयार झालेली डाळीबांची फळे होती.

दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 7 वा. चे सुमारास बाबासाहेब पवार यांनी त्यांच्या बागेत जावून पाहीले असता कोणीतरी अज्ञात भामट्याने 4 लाख रुपये किंमतीचे 200 कॅरेट डाळींबाची फळे चोरून नेल्याचे दिसले. घटनेनंतर बाबासाहेब तुकाराम पवार यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news