ग्रामपंचायत मतदान
ग्रामपंचायत मतदान

महिला मतदारांची टक्केवारी वाढावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रथमच गुलाबी सखी मतदान केंद्र

Published on

कोपरगाव(नगर), पुढारी वृत्‍तसेवा : महिला ही नारी शक्ती आहे, मात्र अलिकडच्या काळावर तिच्यावर सातत्याने अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहेत. महिलांना निर्भयपणे शासकीय-निमशासकीय संकल्पनेत सहभाग देता यावा यासाठी देशाच्या निवडणुक आयोगाने लोकसभा-विधानसभा निवडणुकीत संपुर्ण भारतभर गुलाबी सखी मतदान केंद्राची संकल्पना राबवून महिलामध्ये त्यातून जनजागृती केली.

त्याचधर्तीवर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही कोपरगांव तालुक्यात मौजे शिंगणापूर आणि माहेगांव देशमुख येथे गुलाबी रंगाचे सखी मतदान केंद्र रविवारी उभारण्यात आले. तालुका निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार यांनी सखी गुलाबी मतदान केंद्र संकल्पनेबाबत माहिती दिली. तसेच २४ ग्रामपंचायतीच्या मतदान संरक्षण पोलीसांचा बंदोबस्त होता.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदावर आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मु, कार्यरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध योजना देशपातळीवर राबवत आहेत. देशाची आर्थीक घडी सुरळीत करण्यांत अर्थमंत्री निर्मला सितारामन काम करत आहेत. नारीशक्ती जबाबदारीतून घेते भरारी, तालुक्यात महिला बचतगट चळवळ सध्या मोठ्या प्रमाणात सक्रीय आहे. दिल्लीत मुली-महिलांवर अत्याचार होतात ते कमी करण्यासाठी निर्भया संकल्पना देशभर राबविली जात आहे.

महिला आपल्या कामात कुठेही मागे नाही. ती जबाबदारीच्या जाणिवेतून तिच्याकडे सोपवविलेले कार्य नियमीत पार पाडत असते. ग्रामपंचायत सत्तेची दोरी आता अनेकठिकाणी महिलांच्या हाती आहे, तेव्हा महिलांनी आपल्या गावाचा विकास तालुका पातळीवरील महिलांच्या अडी-अडचणी, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. गुलाबी सखी मतदान केंद्र आणि येथे असलेले निर्भय वातावरण नक्कीच २८ ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत महिलांचा टक्का निश्चित वाढेल असे ते म्‍हणाले.

.हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news