बीड : टाकरवण येथे बैलजोडीसह गाय-वासरूही पळवले | पुढारी

बीड : टाकरवण येथे बैलजोडीसह गाय-वासरूही पळवले

बीड; पुढारी वृत्तसेवा : माजलगांव तालुक्यातील टाकरवण येथील शेतकरी कांता भुंबे यांच्या शेतातील गोठ्यातुन बैलजोडी चोरीला गेली तर अशोक गरड यांच्या शेतातुन गाय व वासरूही चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना तीन दिवसांपुर्वी घडली आहे. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाकरवण येथील गणेशनगर वस्तीलगत टाकरवण ते टाकरवण फाटा या रस्त्यावर शेतकरी कांता भुंबे यांचे शेत आहे. तिथेच बाजुला असलेल्या गोठ्यात भुंबे यांनी बैलजोडी बांधली होती. दोन दिवसापुर्वी भुंबे हे शेतात राखणीला नसल्याचे निदर्शनास आल्याने चोरट्यानी बैलजोडीची चोरी केली. त्याचबरोबर काही अंतरावर असणाऱ्या अशोक गरड यांच्या शेतात बांधलेली गाय व वासरूही चोरून नेले. एकाच रात्री दोन ठिकाणावरून जनावरे चोरीला गेल्याने परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा :

Back to top button