नेवासा फाटा : दुचाकी जप्त करणार्‍यांवर चोरीचा गुन्हा; एकाला अटक

file photo
file photo
Published on
Updated on

नेवासा फाटा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जाचा हप्ता थकल्याने दुचाकी जप्त करायला आलेल्या फायनान्स कंपनीच्या दोन कर्मचार्‍यांवर जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा खुर्द येथील सावतानगर परिसरात राहणार्‍या शोभा पोपटराव नाईक (वय 45) यांनी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे कर्ज घेऊन स्कुटी (एमएच 17 सीएम 8064) खरेदी केली होती.

कर्जाचे हप्ते थकले म्हणून दुचाकी जप्तीचा आदेश निघतो. असा फायनान्स कंपनीचा नियम आहे. असाच प्रकार सावतानगर (नेवासा) येथे घडला. नाईक यांच्या घराच्या आवारातून फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी व अन्य एक जण स्कूटी धक्काबुक्की करून घेऊन गेले. याबाबत नाईक यांनी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली.

त्यावरून प्रवीण आनंदराव शिंदे (रा. राहुरी) व गोपाळ गावडे (रा. झोपडी कॅन्टीन, अहमदनगर) यांच्याविरुद्ध भादवी कलम 392, 363, 511 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले. विविध फायनान्स कंपन्या दादागिरी करणारे दलाल नेमून न्यायालयाचा आदेश नसताना सर्रास नियमबाह्य पद्धतीने वाहने पळवून नेतात. कर्ज घेतल्यानंतर ते भरणे गरजेचे आहे; मात्र थकलेले कर्ज वसुल करण्याचे नियमही विविध कंपन्यांनी पाळणे गरजेचे आहे, असे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news