श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली

श्रीगोंद्यात दोन्ही काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या हालचाली
Published on
Updated on
अमोल गव्हाणे 
श्रीगोंदा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रस एकत्र येण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी पुढाकार घेतला असून हे दोन्ही पक्ष एकत्र आले तरच भाजपला रोखता येणे शक्य होणार असल्याचा मतप्रवाह तयार झाला आहे. भोस यांची शिष्टाई कितपत यशस्वी ठरते, ते लवकरच स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते राहुल जगताप व काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांच्यात दरी निर्माण झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत जगताप-नागवडे अशीच लढत गृहीत धरून दोन्ही गटाचे सक्रिय झाले आहेत. ही सक्रियता सोशल मीडियावर जास्त पाहायला मिळत आहे. दोन्ही कारखान्यांच्या निवडणुकीत ही दरी प्राकर्षाने जाणवली. दोन्ही नेत्यांनी कारखाना अप्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आतापासून विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढण्याचे सूतोवाच वेळोवेळी केले आहेत. दोन्ही नेत्यांच्या या भूमिकेमुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात पडले आहेत. तालुक्यात दोन्ही पक्षांचे वर्चस्व मिळवायचे असेल, तर आगामी निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह निर्माण झाला आहे. या निवडणुका एकत्र लढाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे स्वतः आग्रही आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये ते नेहमीच समन्वयकाची भूमिका पार पाडत असतात. आता ते स्वतःच दोन्ही काँगेसने एकत्र लढावे, यासाठी पुढाकार घेणार असल्याने दोन्ही नेते काय भूमिका घेतात, यावर पुढील आघाडी अवलंबून असणार आहे.
एकत्र लढण्यासाठी पुढाकार
नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही काँगेसला एकत्रित लढावे लागणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये काही मतभेद असले तरी बसून मिटवू. निवडणुका एकत्रित कशा लढल्या जातील, यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत.
मांडवगण गटातूनच निवडणुकीत उतरणार 
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आढळगाव गटातून निवडणूक लढवावी, यासाठी गटातील कार्यकर्ते आग्रही आहेत. मात्र, याबाबत बोलताना बाबासाहेब भोस म्हणाले की, आपण मांडवगण गटातूनच आगामी निवडणूक लढणार आहोत.
हे ही वाचा: 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news