पिंपळगावच्या पंपिंग स्टेशनमधून साहित्य चोरी; गुन्हा दाखल करण्याची मागणी

जेऊर : पिंपळगाव तलाव येथील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व अन्य साहित्याची चोरी.
जेऊर : पिंपळगाव तलाव येथील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व अन्य साहित्याची चोरी.

जेऊर : पुढारी वृत्तसेवा

नगर तालुक्यातील पिंपळगाव तलाव येथील पंपिंग स्टेशन येथून विद्युत पंप व अन्य साहित्याची चोरी झाली. या घटनेबाबत तत्काळ चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवप्रहार संघटनेचे युवक तालुकाप्रमुख गोरख आढाव यांनी केली. पिंपळगाव तलावाचे सुमारे 700 एकर क्षेत्र महानगरपालिकेच्या नावावर आहे.

येथील वनसंपदेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. नुकसान करणार्‍यांवर 126 वृक्षांची तोड केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. परंतु, विद्युत पंप व साहित्य चोरीला गेले.

या घटनेचा पंचनामा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी केला; परंतु या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होत नाही. यामागे गौडबंगाल काय? असा सवाल आढाव यांनी उपस्थित केला, तरी साहित्य चोरीप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आढाव यांनी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news