राज ठाकरे लीलावती रूग्‍णालयात दाखल; उद्या शस्‍त्रक्रिया?

file phto
file phto

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज (मंगळवार) लीलावती रूग्‍णालयात दाखल झाले. गेल्‍या काही दिवसांपासून पायांच्या दुखण्यामुळे ते त्रस्‍त होते. त्‍यांच्यावर बुधवारी शस्‍त्रक्रिया होणार असून, चाचण्यांसाठी आज ते रूग्‍णालयात दाखल झाले आहेत. राज ठाकरेंनी अयोध्या दौरा जाहीर केल्‍यानंतरही त्‍यांना पायाचे दुखणे वाढू लागल्‍याने त्‍यांनी दौरा स्‍थगित केला होता. दरम्‍यान त्‍यांच्या हिप बोनची शस्‍त्रक्रिया होणार असून, वैद्यकिय चाचण्यांसाठी ते आज रूग्‍णालयात दाखल झाले.

राज ठाकरे यांनी महाराष्‍ट्रात मशिदींवरील भोंग्‍यांवरून घेतलेल्‍या भूमिकेमुळे राजकारण चांगलेच तापले होते. त्‍यातच राज ठाकरे यांनी अयोध्येला जावून प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौरा जाहीर केला होता. मात्र उत्तर प्रदशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याला विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्‍याशिवाय अयोध्येत प्रवेश देणार नाही, अशी भूमिका त्‍यांनी घेतली होती.

राज ठाकरेंच्या पायाचे दुखणे वाढल्‍याने अयोध्या दौरा स्‍थगित केल्‍याच्या बातम्‍या  लागल्‍या होत्‍या. दरम्‍यान, राज ठाकरे यांनी एक सभा घेत महाराष्‍ट्रातील काही नेत्‍यांनी मी अयोध्येत जावू नये यासाठी ही खेळी केल्‍याची टीका करत, आपल्‍या कार्यकत्‍यांवर खोटे गुन्हे दाखल होवू देणार नाही, अशी भूमिका घेत त्‍यांनी आपला अयोध्या दौरा स्‍थगित केला.

हे ही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news