अहमदनगर : अंकुश चत्तर हत्याकांडाचा तपास एलसीबीकडे

file photo
file photo

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अंकुश चत्तर यांच्या खुनाचा तपास तोफखाना पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुख्य आरोपी भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व इतर सात आरोपी पोलिस कोठडीत आहेत. सर्व आरोपींची पोलिस कोठडी 24 जुलै रोजी संपणार आहे.

भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याच्या पंटरांनी उपनगरात दहशत माजवत अंकुश चत्तर यांचा निर्घुणपणे खून केला. स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या कटात सहभागी असलेला मुख्य आरोपी स्वप्नील रोहिदास शिंदे याच्यासह अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनिल धोत्रे व एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती.

त्यानंतर राजू फुलारी व अरुण पवार या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली. या खुनाच्या घटनेमुळे सावेडी उपनगरात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. दरम्यान, तोफखाना पोलिसांकडून तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

किरण काळेवर अदखलपात्र गुन्हा

कॉग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अंकुश चत्तर यांचा खून छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील एका प्लॉटचा ताबा प्रकरणावरून झाल्याचा दावा केला. तसेच, मयत चत्तर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी सावेडी उपनगरातील व्यावसायिकांना धमकी देऊन बंद पाळायला लावण्यात आल्याचा आरोप केला होता. शनिवारी चत्तर यांचे नातेवाईक व मित्रपरिवाराने किरण काळेंच्या वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिले. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात किरण काळेंवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news