कोल्हापूर : बालिकेचा लैंगिक छळ | पुढारी

कोल्हापूर : बालिकेचा लैंगिक छळ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : चार वर्षांच्या चिमुरडीच्या असहायतेचा फायदा घेऊन तिचा लैंगिक छळ करणार्‍या नराधमाला चोप देत संतप्त नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.

शैलेंद्र सखाराम पाटील (वय 44, रा. बोळावी, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर त्याला हजर केले असता, त्यास 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

पीडित बालिका व तिची आई शहरातील एका पेठेत भाड्याच्या खोलीत राहतात. मुलीचे वडील परगावी असल्याने आई दुकानात काम करीत असते. आई कामावर गेल्यानंतर संशयित शैलेंद्र पाटील हा घरात येत होता. घरी कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने दि. 2 जून ते 17 जुलै 2023 याकाळात वेळोवेळी चिमुरडीचा लैंगिक छळ केला.

पीडित मुलीने हा प्रकार आईच्या निदर्शनास आणून दिला. आईने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पाटील याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या प्रकारामुळे परिसरात संतप्त पडसाद उमटले. संतप्त नागरिकांनी शैलेंद्र पाटीलची धुलाई करून पोलिसांच्या हवाली केले.

Back to top button