दै. पुढारी अहमदनगर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

दै. पुढारी अहमदनगर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सनईच्या मंगल स्वरांच्या पार्श्वभूमीवर विविध फुलांनी उधळलेल्या सुगंधाने मोहून टाकलेले वातावरण, शुभेच्छांचा वर्षाव आणि गप्पांचा रंगलेला फड… हे वर्णन आहे शनिवारच्या भारलेल्या सायंकाळचे आणि 'दै. पुढारी'च्या नगर आवृत्तीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्याचे…

गुलमोहर रोडवरील पारिजात चौक परिसरातील कोहिनूर मंगल कार्यालयात शनिवारी (दि. 22) सायंकाळी दैनिक पुढारीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त हा हृद्य सोहळा झाला. सायंकाळी सहाच्या सुमारास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन झाले. पुढारीवर प्रेम करणारे, पाठबळ देणारे वाचक, जाहिरातदार, वितरक, तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वाढत जाणार्‍या संख्येने मेळावा उत्तरोत्तर रंगत गेला.

या सार्‍यांनी आणलेल्या पुष्पगुच्छांमधील फुले सुगंधाची मुक्त उधळण करत असताना प्रत्येक जण 'पुढारी'चे मुक्तकंठाने कौतुक करत, शुभेच्छा देत होता. हास्यविनोदाच्या लकेरींसह रंगलेले गप्पांचे फड आणि त्याला खुसखुशीत अल्पोपाहाराची फोडणी… सारे वातावरणच भारून गेले. 'पुढारी'चे सरव्यवस्थापक दिलीप उरकुडे, मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, वसुली अधिकारी सुनील देशपांडे, 'पुढारी'च्या नगर आवृत्तीचे ब्युरो चीफ संदीप रोडे, शाखा व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, तसेच श्रीरामपूरचे कार्यालयीन अधीक्षक विष्णू वाघ आदींनी पुढारी परिवाराच्या वतीने शुभेच्छांचा स्वीकार केला.

आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलिस अधीक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त पंकज जावळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे व संदीप मिटके, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव व मधुकर साळवे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व अशोक कडूस आदींसह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news