

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये जेवण नाकारले म्हणून संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेलमध्ये घुसून मालकास मारहाण करत त्याच्या खिशातील रोख रक्कम व सोन्याची चेन लांबविली. याप्रकरणी चार जणांवर दरोडा व घरात घुसून मारहाण या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला. तर हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव करणाऱ्या सेलिब्रेशन हॉटेलच्या परप्रांतीय तीन ते चार वेटरवरती लैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड करणे या कलमानव्ये गुन्हा दाखल झाला असल्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
याबाबत संगमनेर शहर पोलिसांची पहिल्या घटनेबाबत दिलेली माहिती अशी की संगमनेर शहरात अंकुश अभंग यांचे स्वतःच्या मालकीचे अकोले रोडवर हॉटेल सेलिब्रेशन हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तीन ते चार तरुण हॉटेलात जेवण करण्यासाठी आले होते. मात्र या हॉटेलचे मालक अंकुश अभंग यांनी वेळेचे कारण सांगत जेवण देणे नाकारले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी हॉटेल मालक अंकुश अभंग व हॉटेलचा सुरक्षारक्षक यास मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच या मारामाऱ्या सोडविण्यास आलेल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने मध्यस्थी केली असता त्यालाही तरुणांनी मारहाण केली. तसेच हॉटेल मधील टेबल, खुर्च्या, प्लेट, चमचे, ग्लास-वाट्या अस्ताव्यस्त फेकून देत हॉटेलचे नुकसान केले आणि त्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
अंकुश अभंग याच्या जवळील ४० हजार रुपयांची दिड तोळ्याची सोन्याची चैन आणि ३० हजार .७०० रूपये रोख रक्कम असे ७० हजार७००रूपये हिसकावून पळून गेले. याबाबत हॉटेल सेलीब्रेशनचे मालकअंकुश अभंग यांनी संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी योगेश सुर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे व दिपक रणसुरे यांच्या विरोधात दरोडा घरात घुसून मारहाण शिवीगाळ आदी कलमा न्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत त्याच सेलिब्रेशन हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी प्रथमताच एक तरुणी गेलेली होती. त्या हॉटेलमध्येकाम करणाऱ्या परप्रांतीय वेटरने त्यातरुणीकडे पाहुन टॉन्ट मारत वेगवेगळ्या हावभाव करत होते. ही बाब तीने तिचा मावस भाऊ दिपक रणसुरे यास सांगून त्यास बोलावून घेतले. रणसुरे घटनास्थळी आल्यानंतर या हॉटेलमधील परप्रांती वेटरने त्यास दमबाजी करत त्या तरुणीला वाईट साईट बोलने सुरू केले. त्यावरून वाद वाढतच गेला. याबाबत सदर तरुणीने संगमनेर शहर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हॉटेल सेलिब्रेशनच्या चार वेटरवर गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा अधिक तपास पो नि देविदास ढुमणे यांच्यामार्गदर्शनाखाली सुरू आहे