नागरिकांच्या मतांची मंत्री तनपुरेंकडून मुस्कटदाबी: राम पानमळकर यांचा आरोप

नागरिकांच्या मतांची मंत्री तनपुरेंकडून मुस्कटदाबी: राम पानमळकर यांचा आरोप

नगर : पुढारी वृत्तसेवा
राज्यमंत्र्यांचा नागरदेवळे नगरपरिषद करण्याकरिता अट्टहास का? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असून तनपुरे यांनी नागरिकांच्या मतांची मुस्कटदाबी केल्याचा आरोप नागरदेवळेचे माजी सरपंच राम पानमळकर यांनी केला. पानमळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत भूमिका मांडली. राहुरी नगरपालिकेला अजूनही 1972 साली सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनेतूनच पाणीपुरवठा होत आहे. रस्ते व पाणीपुरवठासह नागरी सुविधांबाबत राहुरी नगरपालिकेची अवस्था नागरदेवळे गावापेक्षा वाईट आहे. नगर विकास मंत्र्यांनी केवळ व्यक्तिगत राजकीय स्वार्थापायी नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी येथील सर्वसामान्यांना नागरिकांना वाढीव घरपट्टी, पाणीपट्टी व इतर भरमसाठ कराच्या खाईत लोटल्याचा असा आरोपही पानमळकर यांनी केला.

ग्रामपंचायतींतर्गत येणार्‍या नागरिकांशी चर्चा करून पुढची दिशा कोणती?, याचा निर्णय घेणार आहोत. नगरपरिषद झाली व निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली तरीही या नगरपरिषदेवर शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावा पानमळकर यांनी केला. नागरदेवळे सरपंच राम पानमळकर, राहुल पानसरे, राजकुमार इटेवाड, गोवर्धन मोरे, नंदु भंडारी, शरद गायकवाड, हरीष सांळुके, दिपक तागडकर, रावसाहेब वाघस्कर, आदित्य शिर्के, राहुल गोंधळे, अजय गारदे, रोहित भुजबळ, शरद गायकवाड, आयुब पठाण, जनार्धन मोरे, मयुर पाखरे, यशवंत पानमळकर, सागर बनकर, महादेव डोकडे, रावसाहेब वाघस्कार, मज्जूभाई सय्यद यावेळी उपस्थीत होते.

नव्या ठेवींचे प्रमाण 47.1 टक्क्यांनी घटले

मराठी माणूस देशाचा पंतप्रधान कधी होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले, मराठीचा झेंडा अटकेपार लागण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्चपदी एक नव्हे, तर अधिक माणसे आपण निश्चितच पाहू. देशात बेघरांची संख्या मोठी असून, अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांच्या त्यात समावेश आहे. तुलनेने जे सगळ्यात खाली आहेत, त्यामुळे त्यांचा विचार अधिक करावा लागतो. आर्थिक आरक्षण हा अतिरिक्त विषय असू शकतो. मात्र, आजही मागासलेपण अधिक आहे. त्यामुळे जात आहे व तोपर्यंत दाखलाही आहे.

मंत्रीपदाचा गैरवापर

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आमदार निधी, 25/15 चा निधी तसेच इतर माध्यमातून तिन्ही ग्रामपंचायतींना निधी दिला. त्यातून रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक वीजपुरवठा सुविधा झाल्या. बुर्‍हाणनगर पाणीपुरवठा योजनेतून 44 गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे तिन्ही गावची लोकवस्तीही वाढत चालली आहे. सर्वसामान्य नागरिकांची मते विचारात न घेता मंत्री पदाचा गैरवापर करत नगरपालिकेचा घाट मंत्री तनपुरे यांनी घातला असल्याचा आरोप पानमळकर यांनी केला.

अण्णांच्या जिल्ह्यात ग्रामसभेचे ठराव बेदखल

तिन्ही गावच्या ग्रामसभेचा नगरपरिषदे विरोधी ठरावाला नगरविकास खात्याकडून केराची टोपली दाखविली गेली. नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाभळी गावचा समावेश असलेल्या नगरपरिषदे करिता जिल्हाधिकार्‍यांनी नागरिकांच्या हरकती मागवल्या होत्या. त्या हरकतीवर कुठलेही स्पष्टीकरण जिल्हाप्रशासनाकडून हकरतदारांना अदयापपर्यंत प्राप्त झालेले नाही. नगरपरिषदेला विरोध केला असतानाही या गावच्या ठरावांना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंच्या जिल्ह्यात नगरविकास मंत्र्यांनी केराची टोपली दाखवून सर्वसामान्य नागरिकांच्या मताचे अवमुल्यन केले असल्याची भावना ग्रामपंचायत सदस्य रोहित भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

अनेकांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. या भागाचे नागरिकरण करण्याचा हेतू काय?, हे नगरविकास मंत्र्यांच्या निर्णयातून स्पष्ट होत नाही.काही बगलबच्च्यांना खुश करणे व राजकीय सुडापोटी नगरपालिकेचा निर्णय घेतला गेला.
महादेव डोकडे,वडारवाडीचे उपसरपंच

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news