अहमदनगर ; महापालिकेत शुकशुकाट, कामकाज ठप्प; सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचार्‍यांचा संप

अहमदनगर ; महापालिकेत शुकशुकाट, कामकाज ठप्प; सातव्या वेतन आयोगासाठी कर्मचार्‍यांचा संप

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा अशी मागणी महापालिका कर्मचारी युनियनने मंगळवारी एकदिवसीय संप पुकारला होता. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून, आज दिवसभर महापालिकेत शुकशुकाट होता.
महापालिका कर्मचार्‍यांना सावता वेतन आयोग लागू करण्यांसदर्भात महापालिका कर्मचारी युनियनने आतापर्यंत वारंवार मोर्चा, निवेदन दिली. आयुक्त, उपायुक्त, मुख्यमंत्री, नगरसचिव विभाग आदींना निवेदने पाठविली होती.

राज्यातील अन्य महापालिकांतील कर्मचार्‍यांना सावता वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, अहमदनगर महापालिकेत अद्याप कर्मचार्‍यांना तो लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे महापालिका कर्मचारी युनियनने आज एक दिवसाचा संप पुकारला होता. या संदर्भात महापालिका युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे व पदाधिकार्‍यांनी आयुक्तांना भेटून निवेदन दिले होते.

कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा संप पुकारल्याने एकही पदाधिकारी महापालिकेकडे फिरकले नाही. केवळ अधिकारीच दालनात बसून होते. या संपामुळे सकाळच्या वेळेत होणारे साफसफाईचे कामही झाले नाही. नगररचना विभाग, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती सभापती, नगर सचिव यांच्या कार्यालयाला टाळे होते. मनपा मुख्य कार्यालय व प्रभाग कार्यालयातील कामकाज ठप्प होते.

1300 कर्मचार्‍यांना नोटिसा

आज महापालिकेत सुमारे 1300 कर्मचारी गैरहजर होते. तर, 288 कर्मचारी हजर होते. त्यामुळे गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांना महापालिका कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजले.

नगर-मंत्रालय लाँग मार्च

दरम्यान, महापालिका कर्मचारी युनियनने सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीदिनी (दि. 2 ऑक्टोबर) नगर ते मंत्रालयापर्यंत लाँर्ग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग मिळण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.

– डॉ. पंकज जावळे, आयुक्त महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news