टाकळी ढोकेश्वर : ‘सीसीटीव्ही’ लावल्यास गुन्हेगारीला चाप बसणार

टाकळी ढोकेश्वर : ‘सीसीटीव्ही’ लावल्यास गुन्हेगारीला चाप बसणार

टाकळी ढोकेश्वर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : औषध विक्रेत्याने आपल्या दुकानात 'सीसीटीव्ही' कॅमेरे लावणे बंधनकारक आहे. दुकानासह रस्त्याच्या बाजूने 'सीसीटीव्ही' लावल्यास गुन्हेगारीला चाप बसेल, असे प्रतिपादन पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहयक आयुक्त हेमंत मेतकर, औषध निरिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, माधव निमसे, जावेद शेख, केमिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव चेतन कर्डिले, उपाध्यक्ष शशिकांत रासकर, सी.ए. प्रसाद पुराणिक, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर, दादा भालेकर, गंगा धावडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पारनेर तालुका केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र औटी, उपाध्यक्ष दत्तप्रसाद सोनावळे, संकेत रोहोकले, संघटनेचे सदस्य रवींद्र बांडे, अनिल भंडारी, नीलेश झावरे, विकास बांडे, नितीन घुले, रवि रोहोकले, कमलेश जाधव, किरण गागरे, बाळासाहेब जगताप, राजेश ठोकळ, स्वामी धरम, सचिन ढोकळे, रवि गोरडे, संदीप रोहोकले, संकेत थोपटे, प्रथमेश पुरी, विकास भनगडे, शुभम निवडुंगे, सौरव व्यवहारे आदी उपस्थित होते. शैलेंद्र औटी यांनी प्रास्ताविक केले.

'शासन निमयमांचे पालन आवश्यक'

सह आयुक्त हेमंत मेतकर यांनी प्रत्येक औषध विक्रेत्याने शासनाने दिलेल्या नियमानुसार काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कोण काय म्हणाले..!

  • निरिक्षक दरंदले यांनी व्यवसाय करताना ग्राहकाशी आपुलकीने संवाद साधत उत्तम सेवा दिली, तर व्यवसायात भरभराट होईल, असे सांगितले.
  • आयुक्त बर्डे यांनी औषध विक्री करताना नियमानुसार करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पारनेर तालुका संघटनेतर्फे आयोजित हा कार्यक्रम स्तुत्य आहे, असे सांगितले.
  • सी.ए. पुराणिक यांनी इनकम टॅक्स, तसेच जीएसटी रिटर्न याविषयी सखोल माहिती दिली.

केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा

टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथे पारनेर तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेची सर्वसाधारण सभा झाली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अशोक बर्डे अध्यक्षस्थानी होते.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news