जोगेश्वरवाडीत आमदार राम शिंदेंचा नागरी सन्मान

जोगेश्वरवाडीत आमदार राम शिंदेंचा नागरी सन्मान

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री तथा आमदार प्रा. राम शिंदेंचा कर्जत नगरपंचायतच्या हाद्दीतील जोगेश्वरवाडी येथे नागरी सन्मान करण्यात आला. माजी नगरसेविका नीता कचरे यांनी आयोजन केले. यावेळी प्रवीण घुले, अशोक खेडकर, सचिन पोटरे, काकासाहेब धांडे, सुनील यादव, गणेश क्षीरसागर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बापूसाहेब नेटके, विनोद दळवी, लक्ष्मण म्हस्के, रामदास पठाडे, अनिल गदादे, अनिल खरात आदी उपस्थित होते.

यावेळी नीता कचरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभागातील नागरिकांना अपंग प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेतील लाभार्थींना प्रमाणपत्र आमदार राम शिंदेंच्या हस्ते वाटप करण्यात आले. नेता कचरे यांनी प्रभागामध्ये पाच वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी प्रवीण घुले, काकासाहेब धांडे, अशोक खेडकर, बापूसाहेब नेटके, सुनील यादव, अनिल खरात, सुरेश खरात, नलवडे आदींचे भाषणे झाली. बापू नलवडे यांनी आभार मांनले.

नीता कचरे याच नगरसेवक : आमदार शिंदे

आमदार राम शिंदे म्हणाले, नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांनी दबावाचे ज्या पद्धतीने राजकारण केले, ते सर्व जनतेने पाहिले. यामुळे जोगेश्वरवाडीची निवडणूक कायदेशीर बिनविरोध झालेली नाही. यामुळे या ठिकाणी निवडणूक होईपर्यंत नीता कचरे याच नगरसेवक आहेत, असे शिंदे म्हणाले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news