नगरमधील 36 चौकांचे सुशोभीकरण ; 11 कोटींची थप्पी हलली

nagar mnc
nagar mnc
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांचा चार कोटींचा निधी परत गेल्याची घटना ताजी असताना महापालिकेच्या बक्षिसाची 11 कोटींचा रक्कम पडून होती. आता माझी वसुंधरा व शहर सौंदर्यीकरणाच्या निधीतून चौक सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. महापालिकेला शहर सौंदर्यीकरण व माझी वसुंधरा अभियांतर्गत दोन बक्षिसे मिळाले. त्याचे 11 कोटी महापालिकेकडे आहेत. त्यासाठी नगरसेवकांनी कामेही सुचविली आहेत. त्यात अमृतवन, स्मृतिवने, शहरी वने, फुलपाखरू उद्यान, सार्वजनिक उद्यान, रोपवाटिका, जलसंवर्धनाचे उपक्रम, नदी, तळे, नाले याचे पुनरुज्जीवीकरण, सौंदर्यीकरणाचे उपक्रम, तसेच शहर सौंदर्यीकरणाच्या निधीतून चौक सुशोभीकरण अशी कामे केली जाणार आहे. बक्षिसातील 50 टक्के रक्कम हरित क्षेत्र वाढविण्यासाठी वापरण्यात यावी, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी विविध प्रभागांमध्ये कामे सुचविली आहेत.

या चौकांचे सुशोभीकरण होणार
भिस्तबाग चौक, एकवीरा चौक, श्रीराम चौक, गुलमोहर पोलिस चौकी परिसर, गुलमोहर व कुष्ठधाम रोड चौक, गंगाउद्यान चौक, तारकपूर चौक, आंबेडकर चौक, गांधीनगर, नागापूर गावठाण चौक, नागापूर चौक, मल्हार चौक, शिवनेरी चौक, शाहूनगर बसस्टॉप चौक, माणिक चौक, सिद्धीबाग नानामठ चौक, रामवाडी चौक, बोल्हेगाव राममंदिर चौक, दिल्लीगेट चौक, गुलमोहर रोड, पत्रकार चौक, कायनेटिक चौक, मनमाड रोडवरील पूल, जुना कलेक्टर ऑफिस चौक, बंगाल चौकी, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, जाधवनगर, वडगाव गुप्ता रोड चौक, भिस्तबाग परिसर चौक, बायजाबाई कॉलनी चौक, श्रमिनगर चौक, संत नामदेव चौक, चाणक्य चौक, तरुणसागर चौक, माळीवाडा वेस

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news