औरंगजेबाचे फलक झळविणारा नगर जिल्ह्यातून हद्दपार

file photo
file photo

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील मुकुंदनगर परिसरात निघालेल्या उरूस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा झळविल्या प्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यातील फलक झळकविणारा मोहमंद सर्फराज इब्राहिम सय्यद उर्फ सर्फराज जहागीरदार (रा.मुकुंदनगर) याला पोलिसांनी दोन वर्षांसाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

मुुकुंदनगर येथील दर्ग्याजवळ 4 जून रोजी संदल उरूस मिरवणुकीत चार जणांनी संगमताने औरंगजेबाचे फलक झळकवित घोषणाबाजी केली. याप्रकरणी भिंगार पोलिसांनी फलक झळकविणार्‍यांचा शोध घेऊन जातीय तेढ निर्माण करणे, साजाजिक द्वेष पसरविल्याबद्दल चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news