..तरी त्यांनी विकला नायलॉन मांजा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

..तरी त्यांनी विकला नायलॉन मांजा; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

नगर : पुढारी वृत्तसेवा : पतंगोत्सवात आणि उत्सव संपल्यानंतरही झाडांमध्ये, विजेच्या खांबांवर, घराघरांवर अडकलेला तुटलेल्या पतंगांचा मायलॉन मांजा अनेकांच्या जिवावर बेतल्याची उदाहरणे दर वर्षी समोर येतात. अनेक पक्षीही त्यामुळे गतप्राण होतात. त्यामुळे नायलॉन मांजावर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबत वारंवार प्रबोधन करण्यात येते आणि कायद्याचा धाकही दाखविण्यात येतो. तरीही काही जण 'आम्हाला काय त्याचे,' असे भासवत नायलॉन मांजा विकतात आणि अनेक जण त्यांचा वापर करतात. जिल्ह्यात अशा 27 जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मकरसंक्रांतीला झालेल्या पतंगोत्सवात जिल्ह्यात नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू होती असे समोर आले आहे. त्या विरोधी विशेष मोहीम राबवत जिल्हा पोलिस दलाने 27 जणांविरुद्ध कारवाई करून गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून मांजा गुंडळण्याचे तीन मशिन व 276 मांजाचे नग असा 1 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना नायलॉन माजा विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील 27 ठिकाणी छापे घालून वरील कारवाया केल्या. 27 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. तोफखाना, राहाता, श्रीरामपूर शहर, लोणी, कोपरगाव शहर, संगमनेर शहर, पाथर्डी, कोतवाली, शेवगाव, श्रीरामपूर शहर, कॅम्प, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, राहुरी, राजूर, एमआयडीसी आदी पोलिस ठाण्यांमध्ये या गुन्ह्यांच्या नोंदी झाल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news