आ. आशुतोष काळेंकडून रस्त्याच्या दर्जाची पाहणी; कामाला गती देण्याच्या सूचना | पुढारी

आ. आशुतोष काळेंकडून रस्त्याच्या दर्जाची पाहणी; कामाला गती देण्याच्या सूचना

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव मतदार संघाच्या पश्चिम भागात महत्वाचा राज्य मार्ग 7 ची दुरावस्था झाल्याने दुरुस्तीसाठी आ. आशुतोष काळे यांनी 10 कोटी निधी मंजुर करुन आणला. सुरु असलेल्या कामाची आ. काळे यांनी पाहणी करून ठेकेदाराला रस्त्याच्या कामाचा दर्जा राखण्याबाबत सूचना केल्या. कोपरगाव मतदार संघात काही वर्षांपासून प्रलंबित खराब रस्त्यांमध्ये पश्चिम भागात रा.मा.7 वर मोर्विस 7 मोर्‍या जिल्हा हद्द ते शहाजापूर रस्ता या रस्त्याचा समावेश होता.

रस्ता अत्यंत खराब झाल्याने लगतच्या गावांतील व्यवसायिकांचे व्यवसाय थंडावले होते. खराब रस्त्यांचा नागरिकांना त्रास झाल्यामुळे लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी आ. काळे यांच्याकडे केली होती. आ. काळे यांनी रस्त्याच्या कामासाठी 10 कोटी निधी दिला. काम काही दिवसांपासून रेंगाळल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे समजताच आ. काळे यांनी स्वत: रस्त्याच्या कामाची पाहणी करुन सुचना केल्या. यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक सचिन चांदगुडे, गौतमचे संचालक कमलाकर चांदगुडे, राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलचे विभागीय सचिव सुनील गाडे, सुरेश चांदगुडे, देवीदास कासोदे, धनंजय गाडे, राहुल चांदगुडे, मदन गाडे, गणेश आहेर, वर्षराज शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button