

एकरुखे : पुढारी वृत्तसेवा : तांत्रिक कामगार युनियन 5059 चे महा अधिवेशन राहाता तालुक्यातील साकुरी येथे उत्साहात पार पडले. अधिवेशनास राज्यभरातील कर्मचार्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आ. प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे होते. यावेळी जि. प. माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, आ. डॉ. किरण लहामटे, राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी खटकाळे, भरत पाटील, सुभाष बोरकर, विकास आढे, राष्ट्रवादीचे रमेश गोंदकर, प्रभाकर लहाने, बी. एकरुखे ः आर. पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ, नितीन चव्हाण , शिवाजी शिवनेचारी, महेश हिवराळे, आनंद जगताप, रघुनाथ लाड, प्रकाश निकम, विक्रम चव्हाण, संजय पाडेकर, गजानन अघम, सुनील सोनवणे, विवेक बोरकर, किरण कराळे, प्रकाश वाघ, विकी कावळे, राहील शेख आदी उपस्थित होते.
सतीष भुजबळ यांनी प्रास्ताविकातून अधिवेशन आयोजनाचा आढावा घेतला. केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी कर्मचार्यांच्या अडचणींबाबत माहिती दिली. यावेळी शालिनीताई विखे म्हणाल्या, घरा-घरात प्रकाश देणार्या तांत्रिक कामगार युनियनच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यास विखे पा. परिवार तत्पर राहिल. आ.तनपुरे म्हणाले, लाईन स्टॉप महावितरणचा महत्त्वाचा घटक आहे. वसुली करण्याच्या कार्यपद्धतीमुळे लाईनस्टाप पूर्णतः खचला आहे. वसुलीस गेलेल्या स्टाफवर प्राणघातक हल्ला करण्याचे प्रमाण वाढले, ही गंभीर बाब आहे.
आ. डॉ. लहामटे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. यापैकीच आता वीज ही महत्त्वाची गरज झाली आहे. विजेची अखंडित सेवा देणारे कर्मचारी मात्र अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतात. त्यांच्यावर येणारी ही वेळ चिंता व्यक्त करणारी आहे. यावेळी नॅशनलिस्ट ट्रेंड युनियन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजी खटकाळे, महापारेषणचे अधिकारी भरत पाटील, केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, बी. बी.पाटील, मोहनदास चोरे यांनी मनोगत व्यक्त केले.
हेही वाचा