Crime news : चैनी करण्यासाठी भावाची बहिणीच्याच घरी चोरी

Crime news : चैनी करण्यासाठी भावाची बहिणीच्याच घरी चोरी

नगर : पुढारी वृत्तेसवा : एमआयडीसी परिसरातील माताजीनगरमध्ये बहीण लग्नाला गेल्याची संधी साधून भावाने दुचाकीवर येऊन बहिणीच्या घरी घरफोडी करून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेणार्‍याला जेरबंद करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने 16 हजार 18 लाख 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सूरज प्रकाश लोढा (वय 29, रा. सावली सोसायटी, भूषणनगर, केडगाव) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी, सुजय सुनील गांधी (वय 33, रा. माताजीनगर, जिमखाना, एमआयडीसी, नगर) 30 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजता नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. रात्री 11 वाजता परत घरी आले असता बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांची रोकड व 4 लाख 80 हजार रुपयांचे 20 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तीन हजारांची लोखंडी तिजोरी असा 7 सात लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या  :

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस कर्मचारी संदीप पवार, रवींद्र कर्डिले, भीमराज खर्से, विजय ठोंबरे, सचिन अडबल, संतोष लोढे, संतोष खैरे, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, अमृत आढाव, आकाश काळे, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, अरुण मोरे यांचे पथक नेमून तपास सुरू केला.

पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फिर्यादीचे घरासमोर एक व्यक्तीवरून आल्याचे दिसून आले. पोलिसांनी शहरातील शहरातील पतसंस्था, गोल्ड लोन देणारे व्यावसायिक, फायनान्स कंपनी यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सोन्याची माहिती घेत असताना फिर्यादीचा मेहुणा सूरज प्रकाश लोढा याने एका फायनान्स कंपनीमध्ये सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवल्याची माहिती मिळाली. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने 3 जानेवारी 2023 रोजी सूरजला केडगावमधून ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
बहीण व मेहुणे लग्नासाठी गेल्याने सोने व रोकड पळविली. चोरीच्या चार बांगड्या फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून रोकड, सोने, मोबाईल, दुचाकी, तिजोरी असा 16 लाख 18 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपासाकामी आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news