Belgaum News : धक्कादायक! फुले तोडण्याच्या कारणावरुन अंगणवाडी सेविकेचे नाक कापले | पुढारी

Belgaum News : धक्कादायक! फुले तोडण्याच्या कारणावरुन अंगणवाडी सेविकेचे नाक कापले

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यातील बसुर्ते गावात धक्कादायक बातमी घडली आहे. एकाने अंगणवाडी सेविकेचे धारदार शस्त्राने नाक कापले. सुगंधा मोरे (वय ५०) असे पिडीत महिलेचे नाव आहे. काकती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील बसुर्ते गावात अंगणवाडी शेजारी राहणाऱ्या कल्याण मोरे याच्या बागेत उगवलेल्या रोपाची फुले एका मुलाने तोडली. याप्रकरणी कल्याण मोरे याने मुलांना मारहाण केली. सुगंधा या मुलांना वाचवू लागल्या. त्यावरून रागाच्या भरात कल्याण घरात गेला आणि विळा घेऊन आला. सुगंधा यांच्या तोंडावर विळ्याने वार करून त्याने पळ काढला. (Belgaum News) काकती पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button