Nagar : बसस्थानक परिसरात मद्यपींवर कारवाई | पुढारी

Nagar : बसस्थानक परिसरात मद्यपींवर कारवाई

नगर : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार, बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसरात मद्यपान करून वाहन घेऊन फिरणार्‍यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. मद्यपान करून वाहन चालविणार्‍या 6 व 4 टवाळखोरांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन राजेंद्र नायक (वय 22, रा. नेहरूनगर भिंगार), दर्शन किरण शहाणे (वय 21, रा. ब्राह्मण गल्ली, भिंगार), महादेव म्हातारदेव गोल्हार (वय 35, रा.करोडी, ता. पाथर्डी), संतोष लिंबाजी आभाळे (वय 41 रा. आभाळवाडी, ता. संगमनेर), रामेश्वर भरत गणेशकर (वय 23, रा. दरेवाडी, नगर), लक्ष्मण पांडुरंग मोटे (वय 38, रा. नेप्ती बायपास रोड, नगर) या सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

सणासुदीच्या काळामध्ये गर्दीच्या ठिकाणी मद्यपान करून सर्व सामान्य नागरिकांना त्रास देणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्मचार्‍यांना सूचना दिल्या आहेत. तसेच, मद्यपान करून बेदरकारपणे वाहन चालविणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. ही पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलिस जवान शरद वाघ, सागर पालवे, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सतीश भांड, सोमनाथ मुरकुटे, श्रीकांत खताडे यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button