‘ट्रायल नोटा’ला भुलला अन् जाळ्यात अडकला!

file photo
file photo
Published on
Updated on

नगर : एक कोटीची लाच मिळणार म्हणून अगोदरच भान हरपले. कोटीच्या नोटांनी भरलेली थैली पाहिली अन् ती हातात घेतली, पण त्यात 99 लाख 50 हजारांच्या 'ट्रायल नोटा' असल्याचे भानही त्याला नव्हते. याच ट्रायल नोटाला तो भुलला अन् लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. कारचे इंडिकेटर लावयाचे हा लाच घेतल्याचा इशारा अगोदरच ठरलेला होता. त्यानुसार इशारा मिळताच एसीबीने झडप घातली अन् त्याला पकडले.

नगर एमआयडीचे सहायक अभियंता अमित गायकवाड याच्यासोबतच धुळे एमआयडीचा उप विभागीय अभियंता गणेश वाघही आरोपीच्या पिंजर्‍यात अडकला आहे. 2 कोटी 66 लाखाचे अंतिम देयके मंजूर करण्याच्या मोबदल्यात तसेच गणेश वाघ या उपअभियंत्यांची (नेमणूक धुळे एमआयडीसी) बॅक डेटेड आऊटवर्ड करण्यासाठी 1 कोटीची लाच गायकवाड याने मागितली होती. नाशिक एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर नगरमध्ये सापळा लावला गेला.

एक कोटी रुपये आणयाचे कसे? असा प्रश्न निर्माण होताच नाशिक एसीबीने नियमावर बोट ठेवत त्यावर उपाय शोधला. पाचशे रुपयांच्या नोटा असलेले 200 बंडल लाच म्हणून देण्याचे ठरले. त्यातील काही बंडलमध्ये वरच्या भागात दोन नोटा असली तर बाकीच्या नोटा या 'ट्रायल करन्सी' म्हणून लावत बंडले तयार केली गेली. हे बंडल एसीबीने तक्रारदाराला दिले. असली नोटाचे कव्हर असलेले बंडल थैलीत वरच्या भागात (खाली सगळे ट्रायल करन्सी बंडल) भरून तक्रारदाराने स्वत:च्या कारमध्ये ठेवले.

शेंडी बायपास चौकाजवळ रस्त्याकडेला कारमध्येच तक्रारदाराने गायकवाड यास 'ट्रायल नोटांचे' बंडल लाच म्हणून दिले. नोटांचे बंडल पाहून भान हारपलेल्या गायकवाडने बंडलमधील 'ट्रायल नोटा'ही बघितल्या नाही. लाचेच्या 1 कोटी रुपयांच्या बंडलमध्ये 50 हजारांच्याच नोटाच फक्त असली होत्या. बाकीच्या 99 लाख 50 हजारांच्या नोटा या 'ट्रायल' होत्या. लाच घेतल्यानंतर 'इंडिकेटर' लागताच एसीबीने कारकडे धाव घेत गायकवाडला पकडले.

पंचासमक्ष गायकवाडकडे चौकशी केली असता धुळे एमआयडीचे उपअभियंता गणेश वाघचे नाव समोर आले. पंचासमक्ष मोबाईलचा स्पीकर ऑन करून वाघ-गायकवाडचे बोलणे झाले. 'पाकिट मिळाले, तुमच्या वाट्याची 50 टक्के कोठे ठेवायची' असे विचारताच तिकडून 'ते पाकिट तुझ्याकडेच राहु दे. ते तुलाच पोहोचवायचे आहे. एक ठिकाण सांगतो. तोपर्यंत तुझ्याकडेच सुरक्षित ठेव', असे उत्तर मिळाले. लाचेत वाघचाही समावेश असल्याची खात्री पटताच त्यालाही आरोपी करण्यात आले. गायकवाडला कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून वाघ हा पसार झाला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news