

रुईछत्तीशी; पुढारी वृत्तसेवा : नगर-सोलापूर महामार्गाचे काम जोरात चालू आहे. मार्गाचा पहिला बाह्यवळण रस्ता रूईछत्तीशी येथून जात असून, तो गावाबाहेरून गेल्याने सध्या गावातील मार्गाकडे महामार्ग विभागाने दुर्लक्ष झाले आहे. धुळीमुळे प्रवाशांबरोबरच वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मार्गावर दररोज पाणी मारले जाते व पुन्हा गाड्या गेल्या की धुळीचे साम्राज्य निर्माण होते. सध्या सर्व प्रकारची स्थानिक वाहतूक याच मार्गावरून होत असल्याने ग्रामस्थ व व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
गावात महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ रस्त्यावर असते. खडी टाकून मार्गाचे अस्तरीकरण करण्यात आले. परंतु, हे अस्तरीकरण वाहनाच्या वर्दळीमुळे लगेच उघडे पडते. सबंधित ठेकेदारास वारंवार सूचना देऊनही कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सबंधित अधिकार्यांना डांबरीकरणासाठी निवेदन देण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू केले नाहीतर महामार्गावर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.
रस्त्यावरून जाताना धूळ डोळ्यात जाते. धुळीचे कण श्वसनाबरोबर शरीरात जातात. त्यामुळे डोळ्यांचे आणि श्वसनाचे आजार वाढले आहेत. रस्ता लवकर डांबरीकरण होणे गरजेचे आहे. बाह्यवळण रस्ता पूर्णपणे सुरू झाला, तर गावातून जाणार्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष राहील म्हणून, हा रस्ता लवकर डांबरीकरण होणे गरजचे आहे.
हेही वाचा