Weather Update : महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड | पुढारी

Weather Update : महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहरातील किमान तापमानात दररोज थोडी थोडी घट होत असून, शनिवारी (दि. 28) शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकले. एनडीए परिसरात पारा 13.3 अंशांवर, तर शिवाजीनगरचा पारा 14 अंशांवर आला. थंडी जाणवू लागल्याने नागरिकांनी उबदार कपडे घालण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला किमान तापमानात पुणे शहराने मागे टाकले. महाबळेश्वरचा पारा 16.5 अंशांवर होता. तर, शिवाजीनगरचा पारा 14 अंशांवर खाली आला. त्यामुळे सायंकाळी 5 पासूनच थंडी जाणवत होती. वातावरणात बदल झाल्याने नागरिकांनी मफलर, स्वेटर, उबदार जॅकेट बाहेर काढली आहेत.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
शिवाजीनगर  14
एनडीए परिसर 13.3
पाषाण 15
लोहगाव 16.3
चिंचवड 19
लवळे 20
मगरपट्टा 20

हेही वाचा

ब्रेकिंग! अजित पवारांना डेंग्यूची लागण

ICC World Cup : टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत मोठी अपडेट, पंड्याची जागा घेणार ‘हा’ स्टार खेळाडू!

UP News : बसपा नेत्याच्या नातवाला पीटी शिक्षकाकडून बेदम मारहाण

Back to top button