Crime News : तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न | पुढारी

Crime News : तलाठी, मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर एमआयडीसी परिसरात नवनागापूर येथे चौघांनी रविवारी (दि. 8) रात्री तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, त्यातील दोघांना जागेवरच पकडले, तर पळून गेलेल्या दोघांपैकी एकाला नंतर पकडले. हे सर्व चोरटे अल्पवयीन असल्याचे तपासात समोर आले आहे.
याबाबत कोतवाल संदीप बबनराव गाडेकर (रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संबंधित बातम्या :

चार चोरट्यांनी रविवारी रात्री नवनागापूर येथील तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हा प्रकार परिसरातील काही नागरिकांनी पाहिल्यावर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करून माहिती दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना पकडले. दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पकडलेल्या दोघांच्या चौकशीत अन्य दोन साथीदारांची नावे पोलिसांना समजली. त्यावरून पोलिसांनी आणखी एकाला पकडले आहे. या चौघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पकडलेले तिन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पसार असलेल्या एकाचा पोलिस शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गणेश चौधरी तपास करीत आहेत.

Back to top button