German university : आदरातिथ्याने भारावले जर्मन विद्यापीठाचे संशोधक | पुढारी

German university : आदरातिथ्याने भारावले जर्मन विद्यापीठाचे संशोधक

दादा भालेकर

टाकळी ढोकेश्वरया(अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील कासारे येथे ग्रामविकासाची चळवळ उभी राहिली आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत लोकसहभागातून कासारे गावचा चेहरा बदलवला आहे. सोशल सेंटरच्या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागत आहेत. गावामध्ये कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत असून, गट शेतीच्या माध्यमातून गावात आधुनिक पद्धतीने शेतकरी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत शेती करत आहेत. कासारे राज्यात आदर्श गाव म्हणून नव्याने नावारुपास येत आहे. आदर्श उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे विकासाला दिशा देत आहेत.

नुकतेच कासारे गावाला जर्मनीच्या विद्यापीठामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आले होते. भारतीय संस्कृती, भाषा, कला, परंपरा, शेती, नैसर्गिक विविधता आदींचा अभ्यास करण्यासाठी ते भारतात आले आहेत. यावेळी कासारेकरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारे येथील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरात व लेझीमच्या तालावर त्यांची गावातून मिरवणूक काढली. आपले स्वागत पाहून जर्मनीचे विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी कासारेचे आदर्श उपक्रमशील सरपंच शिवाजी निमसे, उपसरपंच शैला घनवट, ग्रामस्थांनी बिरोबा मंदिराच्या सभागृहामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

सरपंच निमसे यांनी कासारेचा इतिहास, परंपरा, ग्रामदैवतची ओळख, तसेच भौगोलिक दृष्ट्या गावची ओळख करून दिली. जर्मनच्या विद्यार्थ्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेतले. बिरोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. महादेव डोंगरावर जात भौगोलिक व नैसर्गिक पाहणी करून पावसामध्ये भरलेल्या गावातील बंधार्‍यावर जात पाण्याचे पूजनही केले.

यावेळी सरपंच शिवाजी निमसे, उपसरपंच शैला घनवट, गोकुळ निमसे, देवराम घनवट, तुकाराम साळवे, उत्तम साळवे, दत्तात्रय वाव्हळ, गुणाजी साळवे, विजय वाव्हळ, गौतम साळवे, तुकाराम पानमंद, सुदाम दातीर, लक्ष्मण नरड, विश्वनाथ दातीर, श्रीनिवास शिंदे, पोपट नरड, भाऊसाहेब नरड, सचिन निमसे, रावसाहेब शिंदे, गजानन कासुटे, सखाराम निमसे, आकाश निमसे, बचत गटाच्या अध्यक्षा नेहा वाव्हळ, ज्योसना चौरे, गौतमी साळवे, पूनम निमसे, जनाबाई खरात, भामाबाई पानमंद, मंजुळाबाई नरड, कल्पना निमसे, ज्योती घनवट आदी उपस्थित होत्या.

पुरणपोळीचा घेतला आस्वाद!

तालुक्यातील नैसर्गिक व भौगोलिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कासारे गावात जर्मनचे विद्यार्थी संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी आले होते. गावात त्यांचे महिला भगिनींनी जोरदार स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कासारे येथे
पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद घेतला.

कासारे विकासाचे आदर्श मॉडेल

कासारे गाव हिवरेबाजार व राळेगणसिद्धी नंतर तालुक्यामध्ये विकासाचे मॉडेल बनत आहे. भौगोलिक दृष्ट्या नैसर्गिकतेने हे गाव संपन्न आहे. अनेक विकासाची कामे येथे मार्गी लागत आहेत. गावचे सरपंच शिवाजी निमसे यांनी गावात सामाजिक चळवळ उभी करून गावचा चेहरा मोहरा बदलला आहे.

हेही वाचा

जळगाव : वरणगाव येथे अवैध १८ लाखांचा बायोडिझेलचा टँकर पकडला

Asian Gold Medal : अस्लमच्या रुपात नगरला आशियाई सुवर्णपदक

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे महिला सरपंचाचा राजीनामा

Back to top button