Crime news : कर्जतमध्ये किराणा दुकान फोडणारे दोघे जेरबंद

file photo
file photo
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील निलंगे गल्लीत काल पहाटे किराणा दुकान फोडणार्‍या दोन चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले.
निलंगे गल्लीतील मनोज पाठक यांचे काल पहाटे चार वाजता धनश्री किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप मिठू पोपट पवार व अशोक राम पवार (दोघे सिद्धार्थ नगर, कर्जत) यांनी तोडून दुकानात चोरी करीत असताना परिसरातील नागरिक आवाजाने जागे झाले. त्यांनी दुकानाच्या मालकाला फोन केला. यावेळी नागरिक जमा झाले. त्यांनी चोरटे दुकानात चोरी करीत असताना बाहेरून शटरचे कुलूप लावले. त्यानंतर पोलिसांना माहिती कळविली.

दरम्यान, बाहेर नागरिक जमले आहेत व आपल्याला बाहेर निघता येत नाही, हे पाहून या दोन चोरट्यांनी कोयता दाखवून, तसेच बाहेर आल्यावर गोळ्या घालण्याची धमकी देत दहशत निर्माण केली. तसेच दुकानाची खिडकी तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांनी चोरट्यांना दुकानाबाहेर येण्यास सांगितले. बाहेर येताच चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी मनोज पाठक यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक घनश्याम बळप म्हणाले, हे दोघे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली. शहर व परिसरातील चोर्‍यांचा शोध उलगडा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news