

साकत(पुणे); पुढारी वृत्तसेवा : साकत परिसरात ढगफुटी सद्दश पावसाने अनेकाची पिके पाण्यात गेली आहेत. महादवाडी शिवाराती पाझर तलावाची भिंतखचली, तर कोल्हेवाडीत विजचे खांब पडले आहेत. जामखेड तालुक्यातील साकत परिसरात तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ढगफुटी सदृश्य पावसाने ओढे, नाले, नदी भरून वाहू लागले आहेत. अनेकांचे सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे. महादेवाडी शिवारातील पाझर तलावाच्या भिंत खचली असून, तलाव कधीही फुटले आशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तसेच, कोल्होवाडी शिवारातील महावितरणचे दोन खांब पडले असून, दोन खांब वाकले आहेत. यामुळे परिसरात अंधार पसरला आहे.
तालुक्यातील सर्वात उंचीवर गर्भगिरी बालाघाट डोंगराच्या रांगावर मराठवाड्याचे प्रवेशद्वार असणार्या साकत गावाला तालुक्यात चेरापुंजी समजले जाते. दरवर्षी साकतला तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो; मात्र यावर्षी सुरुवातील पावसाने दाडी मारली होती. पाऊस नसल्याने काही पिके वाय गेली; मात्र परतीच्या मुसळधार पावसाने राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे कोठार म्हणून साकतची ओळख आहे. मात्र, याच पिकांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे.
साकत परिसरातील महादेवाडीवाडी येथील पाझर तलावाच्या भिंतीवरून नागरिक, जनावरे ये – जा करतात. त्यामुळे अनर्थ होऊ शकतो. यामुळे प्रशासनाने पाहणी करून तत्काळ दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा गणेश मुरुमकर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा