नगर : आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या ; अन्यथा राज्यभर चक्काजाम आंदोलन : प्रतिक्षा बंडगर

नगर : आरक्षणाचा ठोस निर्णय घ्या ; अन्यथा राज्यभर चक्काजाम आंदोलन : प्रतिक्षा बंडगर

जामखेड पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्री राज्य सरकारने दखल घ्यावी. नाहीतर गाठ धनगराशी आहे. असा इशारा उपोषणकर्ते सूरेश बंडगर यांची कन्या कु. प्रतिक्षा बंडगर हिने दिला आहे. धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने मुंबईत बैठक घेतली पण ठोस निर्णय घेतला नाही. रविवार उपोषणाचा एकोणीसवा दिवस होता. जर सरकार वेळकाढूपणा करत असेल तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ असे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले. प्रकृती खालावलेल्या उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने सरकारने धनगर आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊन लवकरात समाजाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या किर्ती स्तंभाशेजारी यशवंतसेनेच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी गेल्या १९ दिवसापासून उपोषण सुरू आहे. मुंबई येथे सरकारने आरक्षण संदर्भात बोलविलेल्या बैठकीची चर्चा निष्फळ ठरल्याने राज्यभरातील नेते व समाजबांधव चोंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त करत तीव्र आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगत आहेत.

उपोषणस्थळी प्रकृती खालावलेले यशवंतसेनेचे प्रदेशउपाध्यक्ष सुरेश बंडगर यांची कन्या प्रतिक्षा बंडगर हिने आपल्या भावनांचा बांध मोकळा केला ती म्हणाली वडील सुरेश बंडगर व दुसरे उपोषणकर्ते राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रूपनवर हे १९ दिवसापासून उपोषण करीत असून आता त्यांनी पाणी वर्ज्य केले आहे व उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे' सरकारने दखल घ्यावी नाहीतर गाठ धनगराशी' अशा इशारा प्रतिक्षा बंडगर हिने दिला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news