आणखी दहा आमदार महायुतीत येण्याच्या तयारीत : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे | पुढारी

आणखी दहा आमदार महायुतीत येण्याच्या तयारीत : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा :  आणखी दहा आमदार महायुतीत येण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी येथे केला. या आमदारांची यादीही तयार असल्याचे ते म्हणाले. मात्र त्यांनी ते कोणत्या पक्षाचे आहेत, ते गुलदस्त्यातच ठेवले. अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्याने अनेकजण अस्वस्थ आहेत. कारण आता उर्वरित राष्ट्रवादी काँग्रेसचा सूर्यास्त झालेला आहे, त्यातूनच राहिलेल्या राष्ट्रवादीमधून त्यांना डावलले जात असल्याची भाषा सुरू झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या : 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ‘महाविजय-2024’ अभियानाअंतर्गत ‘घर घर चलो’ यात्रेची सुरुवात बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना बावनकुळे यांनी हे
वक्तव्य केले.

‘बी प्लॅन’ची आवश्यकताच नाही
आमदार अपात्रता सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा ‘बी प्लॅन’ तयार आहे का, या प्रश्नावर बावनकुळे यांनी त्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निष्णात वकील आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील.

 

Back to top button