Saipallavi Wedding : काय सांगता ! साई पल्लवीने गुपचूप केलं लग्न ? वरमालेतील हा फोटो होतो आहे व्हायरल | पुढारी

Saipallavi Wedding : काय सांगता ! साई पल्लवीने गुपचूप केलं लग्न ? वरमालेतील हा फोटो होतो आहे व्हायरल

पुढारी ऑनलाईन : कुरळे केस आणि चेहऱ्यावरील निरागस हावाभावांनी लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी. तिच्या या लूक्स चाहते बरेच आहेत. पण नुकत्याच समोर आलेल्या फोटोमध्ये वरमाला घातलेली साई पल्लवी दिसते आहे. हा फोटो पाहून तिच्या इतर चाहत्यांप्रमाणेच तुमचंही हार्ट ब्रेक झालं असेल तर थोडं थांबा.

या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत राजकुमार पेरियास्वामी दिसतो आहे. हा दाक्षिणात्य दिग्दर्शक आहे. रंगून सिनेमातून त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं. तर यावर्षी त्याचा SK 21 हा सिनेमा रिलीज झाला आहे. साईसोबत व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये साई आणि राजकुमार दिसत आहेत. या दोघांनीही वरमाला घातलेली आहे.

तर हा फोटो कोणत्याही गुपचुप केलेल्या लग्नातील नाहीये. या वर्षी रिलीज झालेल्या SK 21 सिनेमादरम्यानच्या पूजेच्या वेळेचा आहे. याशिवाय साईनेही या वृत्ताचे जोरदार खंडन केलं आहे. साई आगामी नागाचैतन्य सोबतच्या सिनेमात दिसणार आहे.

हेही वाचा :

Back to top button